maharashtra solar subsidy महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप दिले जातात, ज्यामुळे विजेची बचत होऊन सिंचनाची समस्या दूर होते.
maharashtra solar subsidy
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
योजनेची वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंपाच्या किंमतीच्या केवळ १० टक्के रक्कम भरावी लाभ उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदानाद्वारे दिली जाईल.
- अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना फक्त ५ टक्के रक्कम भरावी लागेल.
- ३ ते ७.५ अश्वशक्ती (HP) चे सौर कृषी पंप उपलब्ध आहेत.
- पंपांसाठी ५ वर्षांची दुरुस्ती हमी व विमा संरक्षण.
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही.
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
गाई म्हशी गट वाटपासाठी शासनाची नवी योजना
लाभार्थी निवडीचे निकष maharashtra solar subsidy
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी ३ HP पंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमजूर धारक शेतकऱ्यांसाठी ५ HP पंप, आणि ५ एकराहून जास्त शेतजमीन धारकांसाठी ७.५ HP पंप देण्यात येईल.
- शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणारे नदी/नाले यांच्याजवळील शेतजमीनधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
- शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असावा, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल.
अर्ज कसा करायचा?
- महावितरणच्या अधिकृत वेब पोर्टलवर
- https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php भेट द्या.
- A-1 अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत खालील कागदपत्रे अपलोड करावीतः
- 7/12 उतारा (जलस्त्रोताची नोंद आवश्यक आहे)
- आधारकार्ड maharashtra solar subsidy
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी)
- इतर हिस्सेदारांचा ना हरकत दाखला (शेतजमिनीचा एकटा मालक नसल्यास)
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र.
1 thought on “maharashtra solar subsidy मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू”