government investment schemes
government investment schemes राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले. यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे. आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.
विश्वकर्मा योजना; एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं, जाणून घ्या
विहीर अनुदान योजना
- इनवेल बोअरिंगसाठी आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार देण्यात येईल.
- नवीन विहिरींबाबत 12 मिटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे.
- तसेच दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
- शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.government investment schemes
- त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल.
- अशाचप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प आणि बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.
- याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
राज्यात १०२ टक्के पेरण्या government investment schemes
- दरम्यान, राज्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.
- गेल्या वर्षी याच सुमारास सरासरीच्या ८१.४ टक्के पाऊस झाला होता.
- १ जून ते २ सप्टेंबर पर्यंत १००२ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यात खरीपाचे १४२.०२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १४४.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
- केवळ पाच तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून ३०५ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.